राज्यातील ‘या’ भागात २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पाऊस

परभणी – राज्यात सातत्याने बदलत जाणाऱ्या वातावरणाच्या परिणामामुळे पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. मराठवाडा ते दक्षिण किनारपट्टीपर्यंत (अंतर्गत कर्नाटक मार्गे) उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजेच दि.२७ ते ३० एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने याबाबतची माहिती दिलीये.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार विद्यापिठाने सांगितले की, परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होवू लागला आहे. सोमवारी तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली. तापमान वाढू लागल्याने उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. तापमानातील बदलामुळे वातावरणातही सायंकाळच्या वेळेला वारे वाहू लागले आहेत.

यातूनच दि.२७ ते ३० एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे. परभणीसह बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट होवून पाऊस होण्याची शक्यता आहे. या दरम्यान हवेचा वेगही जास्त राहणार असल्याचे ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने म्हटले आहे. दरम्यान, पाऊस पडल्यास वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण होईल, त्यामुळे गरमीने त्रस्त नागिरकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल हे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या –