‘या’ जिल्ह्यात पहिल्या दिवशी ६४७ आरोग्य सेवकांनी घेतली लस

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील ६४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

कोविड १९ लसीकरणासाठी ऑफलाइन नोंदणी करू नये व कोविन अॅप मार्फतच नोंदणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी मुंबईसह राज्यात लसीकरण होणार नाही. अॅपबाबतचे तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतरच पुढील लसीकरणाला सुरुवात होईल, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास व मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बन्सीलाल नगर येथील आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, अधिपरिचारीका, कर्मचारी आदी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील सिल्लोड (७९), पाचोड (४६), अजिंठा (५४)आणि वैजापूर (३३) आणि शहरातील घाटी (७४), सिडको एन 11 (८१), सिडको एन आठ (८०), बन्सीलाल नगर (८१), सादात नगर (६९), भीम नगर (५०) येथील केंद्रावर एकूण ६४७ आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –