राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ३ हजार रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना

पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम दिसून आला होता. एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. आज पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या कहिओ दिवसांपासून २ हजारांच्या आत येत आहे.

पुणे शहरात आज नव्याने १ हजार ६९३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५७ हजार ९८६ इतकी झाली आहे. शहरातील ३ हजार ०३३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख २८ हजार ०२३ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १२ हजार ४०९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख ५२ हजार ६१९ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ६५९ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –