‘या’ शेतकऱ्याच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला तब्बल अडीच किलोचे लिंबू

हिसार – हरियाना राज्यातील हिसार मंडी किशनगढ़ चे रहिवासी असलेले शेतकरी विजेंद्र थोरी यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला तब्बल अडीच किलोचे लिंबू आले आहे. हे ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल मात्र हे खर आहे. हा निसर्गाचा एक चमत्कार असून हे लिंबू जवळ जवळ तरबूजाच्या आकाराचे आहे.

विजेंद्र उर्फ विजय थोरी यांनी सांगील कि, त्यांनी पंजाब हून आणून त्यांची ७ एकर जमिनीवर किन्नी या झाड लावली होती. या सोबतच लिंबू देखील लावले होते. मात्र हि लिंब सामान्य आकारापेक्षा जास्त म्हणजे 2 किलो 464 ग्राम इतके याचे वजन आहे. यावेळी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केल्याच देखील सांगितलं.

विजेंद्र थोरी यांच्या शेतातील हे लिंब बघण्यासाठी सध्या लोक गर्दी करत आहेत. तर लोक हि लिंब मोठ्या उत्साहाने घेऊन जात आहेत. त्यानंतर आता हे शेतकरी गिनीज बुक आफ वल्र्ड रिकार्ड मध्ये हा विक्रम नोंदवण्यासाठी अर्ज करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –