यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा कल तुर-साेयाबीनकडे तर कापुस व मका क्षेत्राच्या पेरणीमध्ये घट होण्याची शक्यता

औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात आधारभुत किंमतीपेक्षा जास्त भाव मिळाल्यामुळे तसेच इतर पिकापेक्षा उत्पादन खर्च कमी असल्याने शेतकर्‍यांचा कल तुर आणि सोयाबीन या पिकाकडे दिसुन येतआहे. त्यामुळे कृषी विभागाला अपेक्षित असलेल्या कापुस व मका क्षेत्राच्या पेरणीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाने रोहिणी नक्षत्रात हजेरी लावुन मृग नक्षत्रात ७ जुन पासुन जिल्ह्यात सर्वदुर बरसला. कोविड महामारीमुळे शेतकरी गावातल्या पारावरच असल्यामुळे शेतीच्या मशागतीला चांगला वेळ देता आला. आता तर १ जुन पासुन पाऊस पडत असल्यामुळे शेतकर्‍यांनी मशागतीची कसर सोडली नाही. मागच्या वर्षी ही मान्सुनचे आगमन वेळेवर झाल्याने पेरणीही वेळेवर झाली. त्यामुळे कापूस, मूग, मका, उडिद या पिकांचे काढणीच्या वेळी ३३ टक्कयापेक्षा जास्त नुकसान झाले होते.

सततच्या पावसामुळे फवारणी न करता आल्यामुळे कापसावर शेवटच्या टप्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता.शेवटी-शेवटी तर कापूस वेचणीला, मका काढणीला मजुरांची चणचण भासू लागली. त्यातच मूग, तुर, कापूस, सोयाबीन या पिकांना आधारभुत किंमतीपेक्षा जास्त भाव मिळु लागला. सोयाबीनची आधारभुत किंमत ३ हजार ८८० रूपये क्‍विंटल असताना खुल्या बाजारात ८ हजाराचा भाव मिळाला. तर तुरीलाही ७ हजाराचा भाव मिळाला.

सोयाबीन हे दुबार पिक असुन ते रब्बीमध्येही घेता येते. या दोन्ही पिकांचे बियाणे घरीच तयार करण्याची कला शेतकर्‍यांना अवगत असल्याने बियाण्यांची अडचण येण्याची शक्यता कमीच आहे. या खरीप हंगामात सोयाबीनचे २० हजार १०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित असून १५ हजार ७५ क्चिटंल बियाणे लागणार आहे. त्यापैकी यात शेतकर्‍यांनी देखील बीज राखून ठेवले आहे.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांनी तयार करण्यात आलेल्या सोयाबिन बियाण्यांचा या हंगामात उपयोग होणार आहे. सोयाबिन व तुर बियाणे विक्रीमुळे शेतकर्‍यांचा दुहेरी फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –