कोरोनाचा वाढता धोका पाहता पंतप्रधानांनी बोलावली तातडीची मंत्रिमंडळ बैठक; महत्वाचा निर्णय येणार का?

नरेंद्र मोदी

दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अन्य काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात असून आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असल्याने स्थिती गंभीर बनत आहे.

या पार्श्वभूमीवर देशात देखील कडक निर्बंध लागण्याची शक्यता गेल्या दोन दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पश्चिम बंगालचा दौरा आटपून दिल्लीत दाखल झाले असून आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याचे समजत आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

१ मे पासून १८ वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरण होणार सुरु !

कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –