राज्यातील ‘या’ जिल्ह्यात तब्ब्ल एकाच दिवसात वाढले ३७१ कोरोना रुग्ण

कोरोना

औरंगाबाद – औरंगाबाद पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात ३७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी शहरात ३०७ तर ग्रामीण भागात ६४ रुग्ण बाधित रुग्ण आढळून आले. मृतांपैकी सात जण औरंगाबाद जिल्ह्यातील तर एक परभणी जिल्ह्यातील आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार २८७ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ४७ हजार ५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १ हजार २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ४४५ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या ३०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात मनपा हद्दीतील २७९ व ग्रामीणमधील २९ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, औरंगाबादेत रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरातील कांचनवाडी येथील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तर शहरात ५ लसीकरण केंद्रे वाढवण्यात आली आहेत. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पाच दिवसांत दोघांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या –