Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टीचा समावेश

Hormonal Control | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे असते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांना योग्यरीत्या कार्य करण्यासाठी हार्मोन्सची पातळी नियंत्रणात असणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील हार्मोन्सच्या कमतरतेमुळे आरोग्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. हार्मोन्सच्या कमतरतेच्या स्थितीला हार्मोनल असंतुलन असे म्हणतात. हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात.

ब्रोकोली (Broccoli-For Hormonal Control)

शरीरातील हार्मोन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकतात. ज्या लोकांच्या शरीरात इन्स्ट्रोजन हार्मोनची पातळी खूप कमी आहे, त्यांच्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर इतर अनेक हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी ब्रोकोली उपयुक्त ठरू शकते.

कोबी (Cabbage-For Hormonal Control)

शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी कोबीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. कोबीमध्ये आढळणारे घटक शरीरातील हार्मोनसी पातळी राखण्यास मदत करतात. कोशिंबीर, भाजी आणि इतर अनेक प्रकारे तुम्ही कोबीचा आहारात समावेश करू शकतात.

टोमॅटो (Tomato-For Hormonal Control)

शरीरातील हार्मोन्स नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचे सेवन करू शकतात. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवण्याचे काम करतात. त्यामुळे टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलनात राहू शकते.

पालक (Spinach-For Hormonal Control)

पालकाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकांमध्ये माफक प्रमाणात आयरन आढळून येते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी पालक उपयुक्त ठरू शकतो.

शरीरातील हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

व्यवस्थित झोप घ्या (Get proper sleep-For Mental Health)

मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी व्यवस्थित झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज आठ तास झोप घेणे अनिवार्य आहे. व्यवस्थित झोप झाल्यावर तुम्ही दिवसभर ताजे आणि सकारात्मक राहू शकतात.

मेडिटेशन करा (Do meditation-For Mental Health)

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज ध्यान आणि योगासने करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज मेडिटेशन केल्याने मन शांत आणि सकारात्मक राहते. त्याचबरोबर नियमित ध्यान केल्याने शारीरिक आरोग्य देखील चांगले राहू शकते.

पोषक आहाराचे सेवन करा (Consume nutritious food-For Mental Health)

नैराश्य, तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषक आहाराचे सेवन केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतात. निरोगी आहाराचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादींचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर