शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; तूर खरेदी केंद्र कधी उघडतील याची शाश्वती नाही

यवतमाळ येथील खुल्या बाजारात कापसाचे दर घसरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे दर हमीदराच्या खाली आले असून यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू झाली आहे आहे. व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. यानंतरही तूर खरेदीचे हमी केंद्र कधी उघडतील, याची शाश्वती नाही आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली  आहे.

कापसाचे दर ५१०० वर

यवतमाळ मध्ये १६ तालुक्यात तूर खरेदीचे केंद्र उघडले जाणार आहे. विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन आणि खरेदी विक्री संघाच्या नेतृत्वात ही खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाफेडने पूर्वकल्पना म्हणून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली असून या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या ७ हजारांच्या घरात पोहचली आहे. पोते आणि जागेची कमतरता हा मुख्य प्रश्न तूर खरेदी करताना उभा राहणार आहे. तर खरेदी झालेली तूर ठेवायची कुठे हा गंभीर प्रश्न शासकीय यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे.  या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत.

ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळीची लागण

पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबत जुनी तूरही या गोदामात आहे. यामुळे नवीन तूर ठेवण्यापूर्वीच जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग न काढल्यास शेतकऱ्यांना  हमी केंद्रासारख्या मुख्य उपाययोजनांना मुकावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.