दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ – हरीभाऊ बागडे

दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ - हरीभाऊ बागडे haribhau bagade

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गांधेली येथील दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाचे थाटात उद्‌घाटन राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष व दूध संघाचे अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे होते.

शेती करताना जैवसाखळी जपली जावी, मिओरा यांचे वक्तव्य

दूध संघाच्या एकूणच वाटचालीत दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्याचे देणे लागत या भावनेतून ८० टक्‍क्‍यांपर्यंतची रक्‍कम उत्पादकाला कशी मिळेल, या भावनेतून काम केल्याने दूध संघ उभा राहिला. थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे देत आहोत. काम अधिकाधिक पारदर्शी कसे होईल हा प्रयत्न आहे. त्याचाच परिपाक म्हणून दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ करता आली, औरंगाबाद दूध संघाचे अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांनी सांगितले.

आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू- सुभाष देसाई

१९६० ला स्थापन झालेला औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे रूप आता बदलले आहे. आधुनिकतेची कास संघाने धरली आहे. गांधेली येथील दुग्धशाळेची हाताळणी क्षमता आता १ लाख लिटर झाली आहे, अशी माहिती श्री. काळे यांनी प्रास्ताविकातून दिली.