जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ, तर अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती

पुणे – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.

तर, पुणे जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली पुणे जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही २०० पर्यंत आली होती. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा पुणे शहराच्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.

पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ टक्के इतका होता तर आता हा रेट ५.३ एवढा झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. जिल्हा आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे. तसेच, मॉल सुरु करण्याबाबत विचार विनिमय झाला मात्र सेंट्रल एसीमुळे संसर्गाची भीती अधिक असल्याने सध्या मॉल हे बंदच राहणार आहेत. तर, लसीकरण झालं असेल तर 18 वर्षापुढील खेळाडूंना इनडोर गेमला परवानगी देत असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?

  • पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
  • मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने. ४ वाजेनंतर आणि शनिवार-रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने
  • खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत
  • उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

महत्वाच्या बातम्या –