भारताने ओलांडला तब्बल ९० कोटी लसीकरणाचा टप्पा

नवी दिल्ली: भारताने लसीकरणात मोठा विक्रम केला आहे. तब्बल ९० करोड नागरिकांनी लसीकरण टप्पा पार केला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. आणि आजच्याच दिवशी भारताने हा लसीकरण विक्रम केला आहे. दरम्यान भारतात लसीकरण वेग सर्वाधिक असून सतत त्यात नवंनवीन विक्रम केले जात आहेत. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी तब्बल २ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते.

लसीकरण वेग अधिक असल्याने कोरोना संक्रमणाचा वेगही मंदावला आहे. लवकरच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयेही उघडणार आहेत. मात्र यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार आहे. त्यात आता आज पुन्हा एकदा भारताने ९० कोटी लसीकरण करण्याचा विक्रम केला आहे.

महत्वाच्या बातम्या –