नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. मात्र भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वक्तव्य केलं आहे.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोक भारताकडे अधिक मजबूत रूपाने पाहत आहेत. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या या काळातही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू गरीब आणि तरुणांवर आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला – खासदार नवनीत राणा
- राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील नवीन नियमावली लागू, जाणून घ्या
- शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे – कृषीमंत्री
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळाले?
- ‘कापूस’ पीक घेतंय गगनभरारी !
- भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा आणि कोणी सादर केला?