भारतात गेल्या २४ तासात कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी घट

कोरोना

मुंबई :  भारतामध्ये कोरोना बाधितांच्या एकूण आकड्याने ८८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात देशात २९,१६४ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात देशात ४४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशात आता सध्या ४ लाख ३५ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सतत उपाययोजना आणि कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सध्या कमी होताना दिसते आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत अद्याप तरी घट होताना दिसत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३० हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांचा आकडा हा ८८ लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ८८,७४,२९१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १,३०,५१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ८२,९०,३७१ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ४,५३,४०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासात २३३५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३००१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १६,१८,३८० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८५,३६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.४९% झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –