कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये भारत जगामध्ये पहिला

कोरोना

नवी दिल्ली-  जगामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या सलग १० लाखांच्या खाली राहिली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या कमी राहण्याबरोबरच कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये भारत जगामध्ये अव्वल राहिला आहे.

गेल्या २४ तासात देशात सुमारे ११ लाख कोविड – 19 तपासणी चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशात आत्तापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ७ कोटी ७० लाखांवर गेली आहे. कोविड – 19 प्रतिबंधासाठी सर्वाधिक संख्येनं दररोज तपासणी चाचण्या करणाऱ्या जगातील देशांमध्ये भारत अग्रेसर ठरला आहे.

गेल्या २ महिन्यात चाचण्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यात दररोज १२ लाख चाचण्यांवर हे प्रमाण पोचले आहे. प्रत्येकी एक दशलक्ष लोकसंख्येमागे करण्यात येणाऱ्या चाचण्यांचं प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढलं असून सध्या ते १ दशलक्ष लोकसंख्येमागे ५० हजार चाचण्या असं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –