दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक

भारत विरुद्ध विंडिज संघात दुसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा वनडे सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण भारताचा हा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 950 वा सामना असणार आहे.

हा टप्पा गाठणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरणार आहे. सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारताच्या पाठोपाठ आॅस्ट्रेलिया आहे. आॅस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 916 वनडे सामने खेळले आहेत.

Loading...

या दोन संघांव्यतिरिक्त कोणत्याही संघाने आत्तापर्यंत 900 वनडे सामने खेळण्याचा टप्पा पार केलेला नाही. हा टप्पा पार करण्याचा या महिन्यात पाकिस्तानला संधी आहे. त्यांनी 899 वनडे सामने खेळले आहेत.

भारताने आतापर्यंत 949 वनडे सामन्यांत खेळताना 490 जिंकले असून 411 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील 8 सामने बरोबरीत सुटले तर 40 सामने अनिर्णीत राहिले आहेत.

भारताने जरी सर्वाधिक वनडे सामने खेळले असले तरी सर्वाधिक वनडे सामन्यात विजय मिळवण्याच्या यादीत आॅस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 916 सामन्यांपैकी 556 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तान 476 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

याबरोबरच सर्वाधिक वनडे सामन्यात पराभव स्विकारण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. भारताच्या पाठोपाठ या यादीत श्रीलंका असून त्यांनी 406 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.

Loading...

या दोन संघांव्यतिरिक्त कोणत्याही संघाने 400 पेक्षा अधिक सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 397 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

Add Comment

Click here to post a comment
Loading…