‘कृषी व ग्रामीण’ भागाचा विकास झाल्याशिवाय भारत देश आत्मनिर्भर होणार नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

'कृषी व ग्रामीण' भागाचा विकास झाल्याशिवाय भारत देश आत्मनिर्भर होणार नाही - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

पुणे – दिनांक ०४ रोजी वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट(Vasantdada Sugar Institute)  मांजरी मुख्यालयात दोन दिवस साखर परिषद सुरु आहे. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी(Nitin Gadkari) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री उपस्थित होते. कार्यक्रमात ते म्हणले कि ‘ भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भर भारताची घोषणा केली व त्यासाठी काम करत आहे. परंतु कृषी व ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय आपला देश आत्मनिर्भर होऊ शकत नाही त्यासाठी काम सुरु आहे, व ते करणे आवश्यक आहे अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Union Minister Nitin Gadkari) म्हणाले कि ‘आत्मनिर्भर भारताला दिशा देण्याची ताकद कृषी क्षेत्र च देऊ शकते. भारतात साखर उद्योगाची क्षमता मोठी आहे ती सतत वाढत चालली आहे. शेतकऱ्यांचा ऊस असल्याने उसाचे दर आम्ही कमी करणार नाही कमी होऊ शकत नाही पण साखरेचे दर कमी होऊ शकतात. ०

तसेच वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट उद्धघाटन प्रसंगी अनेक दिग्ग्ज नेते उपस्तिथ होते. त्यात अध्यक्षस्थानी शरद पवार अध्यक्ष – राष्टवादी काँग्रेस / माजी केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम,शंभूराज देसाई, सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील – हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ अध्यक्ष – विद्याधर अनास्कर तसेच माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याठिकाणी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –