भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लता मंगेशकर

मुंबई: गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. यामुळेच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होता असतानाच आज त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. आणि त्यातच आज त्या संपूर्ण सिनेसृष्टीला पोरकं करून गेल्या. त्यांच्या आरोग्यासाठी लाखी चाहत्यांनी प्रार्थना केली. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली. आजदो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिये…असं सर्वांनाच लता मंगेशकर पोरकं करून गेल्या.

लता मंगेशकर यांचे प्रारंभिक जीवन-

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण नंतर वडिलांनी “भाव बंधन” या नाटकाने प्रेरित होऊन त्यांचे नाव बदलून लता ठेवले.

लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –