भारतीयांनी करून दाखवलं! कोरोना रुग्णांवर उपचार करणारी मेड इन इंडिया लस 15 ऑगस्टपर्यंत येणार

कोरोना लस

नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे, अशी गेल्या काही दिवसांपुर्वी बातमी होती. मात्र ही लस कधी लाँच होणार याची देखील प्रतिक्षा सर्वांनाच होती. अखेर ही प्रतिक्षा संपणार असल्याचे दिसत आहे, कोरोना रुग्णांवर उपचार करणारी मेड इन इंडिया लस 15 ऑगस्टपर्यंत येणार आहे. या लसीच्या ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

लॉकडाऊनमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन;  प्रति किलो 20 रुपये दर मिळावा अशी मागणी

भारतात कोरोनावर लस तयार झाली असून ही लस भारत बायोटेकने तयार केली आहे. तर भारत बायोटेक व आयसीएमआर तर्फे या लसीचे लाँचिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या लसीला मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दिली आहे. आयसीएमआरने जारी केलेल्या पत्रानुसार ७ जुलैपासून मानवी चाचण्यांसाठी नाव नोंदणीस प्रारंभ होणार आहे. यानंतर, जर सर्व चाचण्या योग्य झाल्या असतील तर १५ ऑगस्टपर्यंत कोवैक्सीन ही लस सुरू करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. कोरोना दरम्यान सर्व प्रथम, भारत बायोटेकची ही लस बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? ऊसतोड मजुरांसाठी पंकजा मुंडे आक्रमक

विशेष म्हणजे हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने अलीकडेच दावा केला होता की कोव्हॅक्सिनच्या फेज -१ आणि फेज -२ मानवी चाचण्यांनाही डीसीजीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चाचणीचे काम सुरू केले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

खतांअभावी वाढली शेतकऱ्यांची डोकेदुखी; सरकारचे झोपेचे सोंग

ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (NIV) मिळून बीबीआयएलने COVAXIN लस विकसित केली आहे. ही लस तयार करण्यासाठी NIVने कोरोनाची लागण झालेल्या पण कुठलीही लक्षणं नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून कोरोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा काढला. त्यानंतर हा स्ट्रेन बीबीआयएलला पाठवण्यात आला. बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली. त्याचबरोबर रुग्णांवर या औषधाचा परिणाम होऊ नये म्हणून हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निष्क्रिय लसीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे.

महत्वाच्या बातम्या –

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा – छगन भुजबळ