ग्रामीण भागासाठी भारतातीलसर्वात मोठी खासगी बँकेची धमाकेदार ऑफर

भारतातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने सणांच्या दृष्टीने ग्रामीण भागासाठी मोठी ऑफर दिली आहे. त्याअंतर्गत अर्ध-शहरी, ग्रामीण भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना मोटार सायकल व सोन्याच्या कर्जावर तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्जावर मोठी सूट दिली जात आहे. ही ऑफर ९ ऑक्टोबरपासून अंमलात आली आहे.

सरकारच्या कॉमन सर्विस सेंटर नेटवर्कशी करार एचडीएफसी बँकेने दरवर्षीप्रमाणेच ‘फेस्टिव्हल ब्लास्ट ऑफर’ सुरू केलेली आहे, यावर्षी त्याने भारत सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर-सीएससी) नेटवर्कशी करार केला आहे, जेणेकरून बँकेला देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवेश मिळेल. आणि ग्रामीण भागातील लोकही याचा मोठा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर अर्ध-शहरी भागासाठी देखील आहे.

ट्रॅक्टर कर्ज, कार कर्ज, मोटारसायकल कर्जावर विशेष सूट एचडीएफसी बँकेने आपल्या योजनेनुसार मोठी सूट दिली आहे. जेणेकरुन लोक कार, ट्रॅक्टर, मोटरसायकल कर्ज घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करु शकतील असे त्यांनी संगितले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १.२ लाख नोंदणीकृत व्यावसायिकांनादेखील सीएससी अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर बँकेशी संबंधित ३००० हून अधिक स्थानिक व्यावसायिकही बँकेच्या वतीने ही सुविधा पुरवतील. या अंतर्गत ५ – १५ % पर्यंत सूट देण्यात येईल.

तुम्हाला कसा फायदा होईल? एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यास इच्छुकांना स्थानिक सीएससीपर्यंत पोहोचून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत प्रक्रिया शुल्कात सूट असेल तर ईएमआयवरही दिलासा मिळेल. इतकेच नाही तर वेळेपूर्वी कर्ज भरणार्यांनाही सूट मिळेल.

ग्रामीण भागात विशेष भर एचडीएफसी बँक ग्रामीण भागातील लोकांना या योजनेद्वारे शून्य प्रक्रिया शुल्कावर कर्ज देईल. इतकेच नाही तर 1999 रुपयांच्या डाउन पेमेंटवर कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर, पहिल्या 6 महिन्यांपर्यंत ईएमआयवर २५% सूट मिळेल. किसान गोल्ड लोन योजनेअंतर्गत प्रक्रिया शुल्क निम्मे करण्यात आले आहे. ही ऑफर ३० सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकेच्या चालू असणाऱ्या ऑफरचे २.० वर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –