लसीकरणात भारताचा ‘महाविक्रम’; एका दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण

कोरोना

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशीच भारताने लसीकरणात नवा विक्रम केला आहे. आज आज एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा 1 कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आज १७ सप्टेंबररोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. या अगोदर असा विक्रम २७ ऑगस्टला झाला होता. त्यावेळी १.३ कोटी नागरिकांना डोस देण्यात आले होते. आज पुन्हा एकदा भारताने हा विक्रम केला आहे

दरम्यान संपूर्ण भारतात लसीकरणाचा वेग वाढण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातही लसीकरण वेगाने सुरु आहे. दरम्यान आज मोदींच्या ७२ व्या वाढदिवशी हा नवा विक्रम भारताने केला आहे. त्यामुळे हा विक्रम म्हणजे मोदींसाठी बर्थडे गिफ्टच असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –