पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर पॉवरचा अभिनव उपक्रम राबविणार – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – विद्युत पुरवठ्यातील तांत्रीक अडचणीमुळे पाणीपुरवठ्याच्या विविध योजना बंद पडतात, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता जिल्ह्यात अभिनव प्रयोग म्हणून दोन ते तीन मेगावॅट उर्जेचा सोलर पॉवर प्रकल्प उभारण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतांना सांगितले.

सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, नियोजन उपायुक्त श्री. सुपे, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नियोजन अधिकारी अधिकारी गजानन वायाळ, उपविभागिय अधिकारी रोहन घुगे प्रामुख्याने उपस्थित होते.

कृषी विभागाचा आढावा घेतांना जिल्ह्यातील शेत पिकांवर मावा, तुडतुडे, बोंडअळी, लाल्या या रोगांमुळे धाण्य व कापूस पिकांचे 5 हजार 700 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून रोग अजूनही पसरत असल्याने सर्व नुकसान ग्रस्तांच्या शेतीचे तातडीने सर्वे करून त्यांना मदत मिळण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून जिल्ह्यासाठी मदतनिधी खेचून आणू असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच पिक विमा कंपन्यांकडूनही तातडीने मदत मिळावी म्हणून लवकरच त्यांचेसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृषी पंप बंद आहेत, त्यांची दुरूस्ती तात्काळ संबंधीत कंपनीकडून करून घेणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. मात्र कृषीपंप दुरूस्ती करून घेण्याकडे पुरेसे लक्ष देण्यात येत नसल्याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्र्यांनी विद्युत विभाग, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, आदिवासी विकास, कृषी, आरोग्य, नगरविकास व इतर विभागांचा आढावा घेतला.
नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील,  विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, निलय राठोड, नगरविकास विभागाचे विजय सरनाईक, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी रुपेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सोनुने तसेच संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थ‍ित होते.

महत्वाच्या बातम्या –