निरोगी राहण्यासाठी प्लास्टिकऐवजी वापरा ‘या’ इको फ्रेंडली बॉटल्स

बॉटल्स

आपल्याकडे किती पैसे, गाडय़ा आहेत यापेक्षाही महत्त्वाचे असते ते आपले आरोग्य कसे आहे. ते नीट राखायचे तर समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला पाण्याची आठवण येत. त्याचप्रमाणे उन्हाळ्यातही आपल्या पाणी भापूर लागते. आपल्याला दिर्घकाळ निरोगी राहण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी पिण्यात जर तुम्ही कंजुशी करीत असाल तर ते चुकीचे आहे. शरीर निरोगी आणि त्वचा तजेलदार राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते तशी पाण्याची आवश्यकता आहे. पण पाणी पिताना आपण अनेक वेळा प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर करतो. पण त्या प्लास्टिकच्या बॉटल्स आपल्या शरीराला खुफनीकरक असतात हे तुम्हाला माहित आहे का ? आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी प्लास्टिकऐवजी इको फ्रेंडली बॉटल्स वापर करायला हवा. चला तर मग पाहुयात कुठल्या बॉटल्सचा आपण वापर करायला हवा.

मातीच्या बाटल्या

प्लास्टिकच्या कोणत्याही कंटेनरमधल्या पाण्यापेक्षा गारेगार माठातलं पाणी केव्हाही उत्तमच असतं. तसंच प्लास्टिकच्या बाटलीलाही मातीची बाटली हा पर्याय होऊ शकेल. अशी बॉटल फ्रिजमध्ये ठेवण्याचीही गरज नाही. मातीच्या भाड्यातलं पाणी प्यायल्याने शरीरातलं टॉक्सिन बाहेर निघायला मदत होते. पचन क्रिया सुधारते. गॅस, अपचनासारखे विकार होत नाहीत.

२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

तांब्याच्या बाटल्या

कॉपर किंवा तांब्याच्या बाटल्या खरेदी करण्याकडे आजकाल कल वाढत आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रणात राहणे, जंतुसंसर्ग न होणे असे अनेक फायदे तांब्याच्या बाटलीतील पाण्याच्या सेवनाने होतात. पण तुम्ही खऱ्या तांब्याची बाटली घेतलीय की ती केवळ वरवर तांब्यासारखी दिसतेय हेही जरूर पहा.

स्टीलची बॉटल

सध्या बाजारात स्टेनलेस स्टीलच्या बॉटल्सही पाहायला मिळतात. या बॉटल्स अशा बनवल्या जातात की त्यात पाणी किंवा कोणतंही लिक्विड टाकल्यास त्याचा वास किंवा मेटलची टेस्ट येत नाही. ही बॉटल पूर्णपणे सुरक्षित असते. त्यात पाणीही खूप वेळपर्यंत थंड राहते.

काचेची बॉटल

काच हादेखील प्लास्टिकला एक उत्तम पर्याय आहे. पण ही बॉटल हाताळताना फार काळजी घ्यावी लागते. घरात तुम्ही एकवेळ काचेची बॉटल वापरू शकता, पण बाहेर ती सांभाळणे जिकरीचे असते. त्यावरही उपाय म्हणून हल्ली अशा काचेच्या बॉटल्स संरक्षक कापडी आच्छादनात येतात. काचेच्या बाटलीत पाणी किंवा कोणत्याही लिक्विडची मूळ चव जशीच्या तशी राहते.

महत्वाच्या बातम्या –

सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस

जाणून घ्या मुतखड्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय….

नववर्षात वर्ध्यात महिनाभरात आठ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या