कोल्हापूर – नव्या कृषी कायद्यांविरोधात सहा दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. तर, नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अस देखील शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आता दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’ने राज्यभर आंदोलन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं या आंदोलनात त्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं तर आंदोलनादरम्यान धक्काबुक्की देखील झाली.
दरम्यान, हे पंजाबच्या, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. शेतकरी म्हणजे काय अतिरेकी आहे का? पोलीस बळाचा वापर का? आम्ही न्याय मागतोय. तीन विधेयकं मंजूर केली त्याचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता ही विधेयकं का लादली? आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. गेल्या सहा महिन्यात पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिली, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारलाय.
महत्वाच्या बातम्या –
- अन्नपदार्थांसाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो
- ‘हे’ घरगुती उपाय केल्याने ५ मिनटात दूर होईल तोंडाची दुर्गंधी
- रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या
- ‘या’ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चार कोटींची नुकसानभरपाई मंजूर