चंद्रकांत पाटलांनी सामनासाठी सुचवले मुद्दे, त्यामध्ये कर्जमाफीपासून ते पारनेर नगरसेवकांपर्यंत

चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत

मुंबई – सध्या संपूर्ण जगाला हैराण करून टाकणारी गोष्ट म्हणजे कोरोनाचा वाढत प्रसार. यामुळे खूप आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. यामध्ये नागरिकांना खूप गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अजून एक गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सध्या पेरणीसाठी पैसे नाहीत आणि ज्यांनी पेरणी केली त्यांचे बियाणे बोगस निघाल्याने त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यासोबतच भारत-चीन वाद, यावर गेल्या काही दिवसांपासून कुरघोडी सुरू आहेत. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामना अनेक गोष्टींवर भाष्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही मुद्दे सुचवले असून ते छापण्याचे चॅलेंज खासदार संजय राऊत यांना येणाऱ्या रविवारच्या रोखठोकसाठी दिले आहेत.

पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुनर्वापर करा – जयंत पाटीलचंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुद्यांमध्ये पहिला मुद्दा असा आहे की, “मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय 10 आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे. तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द……. मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे….”

तसेच त्यामधील दुसरा मुद्दा असा आहे की, “पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते. पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत. मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”

नुकसानग्रस्त भागातील रस्ते-पूल तत्काळ दुरुस्त करावेत – ॲड.यशोमती ठाकूर

तसेच त्यातील तिसरा मुद्दा असा आहे की ,“ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे. यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही. मात्र कोरोनाचा मृत्यूदर वाढत चालला आहे. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”

त्यामधील चौथा मुद्दा असा आहे की , “राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचे ढोल बडवले. अजूनही अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”

महत्वाच्या बातम्या –

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका, बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई – रामदास कदम