राज्यात पुढील दोन ते तीन दिवस ‘या’ ठिकाणी थंडी वाढणार

पुणे – विदर्भ, मराठवाड्यानंतर मध्य महाराष्ट्रात थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यामुळे किमान तापमानात मोठी घट झाली असल्याचं दिसून येत आहे, किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आलेला आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागांत थंडीचा कडाका वाढलेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी थंडी वाढणार असल्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे ८.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोद झाली असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

गेल्या दोन पहिले हिमालयाच्या पायथ्याशी पश्‍चिमी चक्रावात धडकला होता. यामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असल्याने किमान तापमानात मोठी घट झाली आहे अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या या चक्रावाताचा प्रभाव कमी झाला असला, तरी १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आणखी एक पश्‍चिमी चक्रावात धडकणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे उत्तर भारतात थंडी वाढणार आहे. राज्याच्या सर्वच भागांत थंडीचा कडाका जोरादार वाढणार आहे. याबरोबरच पूर्वेकडून अचानक थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे देखील राज्यात वाढलेली आहे.

राज्यात गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत सहा अंश एवढा खाली घसरला आहे. विदर्भात ११ ते १८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ११ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चांगलीच घट झाली असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण जास्त वाढले आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्याही किमान तापमानात घसरण झाली आहे अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –