मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. तर हवामान विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांगलाच पाऊस पडला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
तर पुढील 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर यामुळे राज्यात पुढील २ ते ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर राज्यातील जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड , रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्यांमध्ये हा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील मुंबई भागात ढगाळ वातावरणसह असून पाऊस पडला आहे. तर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर औरंगाबादमध्ये ही ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाने लावली हजेरी
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता
- मोठी बातमी – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
- सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
- दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध