पुढच्या काही तासात राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

पाऊस

मुंबई –  राज्यात पुढील ४८ तासांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा पाऊस जोरदार कमबॅक करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आज पुढील ४८ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज केवळ आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

तसेच यावेळी हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत या ठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर राज्यातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळणार आहेत. संबंधित जिल्ह्यांत राहाणाऱ्या नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –