राज्यात उद्यापासून पावसाला होणार सुरूवात; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे –  राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  तर आता हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे, राज्यात येत्या गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात होणार आहे. तर राज्यातील कोकण आणि विदर्भात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक भागात पाऊस पडणार आहे. तर उद्या राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे, तर राज्यातील काही भागांत दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे, मात्र आता राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.



तर उद्या दि ८ जुलै आणि ९ जुलै या रोजी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या –