जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने जगबुडी पूल बंद

जगबुडी पूल बंद

सोमवार दुपारनंतर तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पुन्हा एकदा महामार्गावरील जगबुडी पूल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जगबुडी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने गेल्या महिनाभरात सातव्यांदा जगबुडी पूल बंद करावा लागला आहे.;

शुक्रवार 26 जुलै रोजी जगबुडीची पातळी अशीच वाढल्याने रात्री 8.30 वाजता जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. तब्बल 15 तासांनंतर म्हणजे शनिवार 27 रोजी सकाळी 11.30 वाजता तो सुरू करण्यात आला आहे. महामार्गावरील प्रवासी जवळ जवळ 15 तास महामार्गावरच लटकले होते. आता पुन्हा एकदा वाहतुकीस पूल बंद झाल्याने महामार्गावरील प्रवासी एक-दोनदा नव्हे तर सातव्यांदा लटकले. पूल बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.महत्वाच्या बातम्या –

आता होणार भात लावणीच्या कामातून मजुरांची सुटका ; हरणगावात स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

कोकण किनाऱ्यावर भरती-ओहोटी वाढण्याची शक्यता; समुद्र किनारे बंद ठेवण्याच्या सूचना