उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे जलजिरा! जाणून घ्या

उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ होते असते.सततच्या उष्णते मुळे अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा! उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे.

जाणून घ्या जलजिरा महत्व

जिरा पूड, आले, काळे मीठ, पुदिना, आमचूर पूड इत्यादी अनेक पदार्थ कमी-जास्त प्रमाणात त्यात वापरून जलजिरा बनवले जाते.जलजिऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थानुसार त्याचे गुणधर्म बदलत जातात. जलजिऱ्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच परंतु शरीरातली उष्णताही कमी होते.पचनाच्या तक्रारी दूर होतात.अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा. अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यसाठी जलजिरा हे उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या –