यातून भाजपचे मनुवादी स्वरूप समोर आले – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : आदिवासी शेतकऱ्यांना नक्षलवादी, माओवादी म्हणणे ही अतिशय निषेधार्थ बाब आहे. यातून भाजपचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे. भाजपच्या पोटात काय आहे हे यानिमित्ताने शेतकऱ्यांना कळले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील गट नेते जयंत पाटील यांनी पुनम महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर दिली आहे.

भाजपच्या नेत्या पुनम महाजन यांनी जे वक्तव्य केले ते मनुवादी वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. १८० किमीचा प्रवास करून ते शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पोहोचले आहेत.परंतु पुनम महाजन यांनी या लढ्याला शहरी नक्षलवादी आणि माओवादी असे रंग देणे हे स्पष्ट करते की भाजपची शेतकऱ्यांप्रती काय आस्था आहे. शेतकऱ्यांबाबत यांच्या मनात किती द्वेष भावना आहे हे यातून स्पष्ट होते असे पाटील म्हणाले.

भाजपच्या पुनम महाजन यांनी किसान लॉंग मार्चमधील शेतकऱ्यांना नक्षलवादी,माओवादी अशा स्वरुपाचे शब्द वापरल्यानंतर जयंत पाटील यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.