सांगली – परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.
गेल्या ४८ तासांपासून सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तोंडचा घास हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. या कठीण काळात आज खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देत शेतकरी बांधावांना दिलासा दिला. pic.twitter.com/lSmh7Eao03
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) October 16, 2020
दरम्याण, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन भेट घेतली.यावेळी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हाअध्यक्ष अविनाश पाटील, बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, किसन जानकर, प्रांताधिकारी, तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान प्रशासकीय अधिकारी माझ्यासमवेत उपस्थित होते. या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सरकार शेतकरी बांधवांच्या मागे खंबीर उभे आहे. pic.twitter.com/0OQgCrukcG
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) October 16, 2020
मागील ४८ तासांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. झालेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला सोबत घेऊन आज खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
महत्वाच्या बातम्या –
- पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्याकडची नाणी विकून होऊ शकता लखपती
- प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या!
- रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
- राज्यात पुन्हा चक्रीवादळाच सावट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार तडाखा