जिजामाता सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करणे हे आपले ‘ड्रीम प्रोजेक्ट’

बुलढाणा येथील सिंदखेडराजामधील जिजामाता सहकारी साखर कारखाना आधी सारखे सुरू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित विभागाला दिले. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हा जिजामाता सहकारी साखर कारखाना आधी सारखे सुरू करणे हे आपले ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याचे जाहीर केले आहे.

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

त्या संबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत हा साखर कारखाना आधी सारखा सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. सहकार विभागाने साखर कारखाना सुरू करावा, अशी आग्रही मागणी डॉ. शिंगणे यांनी केली. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या कारखान्याच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकारमंत्री पाटील यांनी मुंबई येथे नुकतीच बैठक घेतली.

यावेळी डॉ. शिंगणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत साखर कारखाना आहे त्याच ठिकाणी कशाप्रकारे पूर्ववत सुरू करता येईल, यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.