परदेशातून कांदा आयात करणे हे सरकारचे चुकीचे धोरण-जितेंद्र आव्हाड

कांदा

आपल्याकडील कांदा उत्पादकांमध्ये तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या सर्वांचा परिणाम बाजारातील व्यापारांवर होत असल्यामुळे त्यांनी थेट इजिप्तहून कांदा आयात केला. तो कांदा आज वाशीतील घाऊक बाजारात दाखल झाला आहे.याच कांदा आयातीवरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असतानाही या सरकारने कांदा आयात केला आहे. इजिप्तचा कांदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आला असून, २० रुपये किलोने विकला जात आहे. हे सरकार बेशरम असून, शेतकऱ्यांनी विचार आणि अभ्यास करुनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सरकारवर टीका करत केले आहे.

Loading...

तेसच परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आत्ता नवीन नाही. या पूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणांहून कांद्याची आवक झाली आहे. मात्र, आपल्या देशातील शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना परदेशातून कांदा आयात करणे हे चुकीचे धोरण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसून शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रात पाणी अडवण्यासाठी नद्यांवर बंधारे नसल्यामुळे तब्बल ४० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेलं

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करीत आहे – अजित पवार

Loading...