टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नौदल (Indian Navy) इच्छुक उमेदवारांना नोकरी संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलाच्या आस्थापनेवरील अग्निवीर (MR/SSR) पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तरी या पदासाठी पदानुसार पात्रता उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे. या पदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर अग्निवीर पदांच्या जागा
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अग्निवीर (MR/SSR) पदांच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता
अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलामध्ये सुरू होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार शिक्षण मंडळाने मान्यता दिलेले शालेय शिक्षण मंडळातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या. त्याचबरोबर या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्त्वाच्या तारखा
भारतीय नौदलाच्या अग्निवीर पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार दिनांक 8 डिसेंबर 2022 पासून ते दिनांक 17 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- BJP | “उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”, या भाजप खासदाराचा टोला
- Sachin Ahir | “कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं…”, सचिन अहिर यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
- Sushma Andhare | सुषमा अंधारेंनी शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या…
- Uday Samant | “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे…”, उदय सामंत संतापले
- Sanjay Gaikwad | “…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू”, संजय गायकवड यांचं ओपन चॅलेंज