Job Alert | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रामध्ये (MAHAGENCO) विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Alert | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रामध्ये (MAHAGENCO) विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

टीम महाराष्ट्र देशा: सरकारी परीक्षेची (Goverment Exam) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी सरकारकडून मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे राज्य सरकार अनेक उमेदवारांना नोकरी संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जागांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अभियंता पदाच्या एकूण 661 रिक्त जागा

महानिर्मिती वीज औष्णिक केंद्र यांच्यामार्फत अभियंता पदाच्या एकूण 661 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पदानुसार पत्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र मार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी पदानुसार इच्छुक उमेदवारांनी या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

महानिर्मिती औष्णिक केंद्रामार्फत सुरू झालेल्या या बंपर भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार दिनांक 17 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकते. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या