Job Opportunity | टीम कृषीनामा: सरकारी नोकरी (Goverment Job) च्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट विभाग (Indian Post) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी टपाल विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भारतीय टपाल विभागाच्या या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या तब्बल 40,889 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. GDS पदासाठी अर्ज करणारा इच्छुक उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. इयत्ता दहावीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे या पदांसाठी अर्जदारांची निवड करण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष असावे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शंभर रुपये फी भरावी लागणार आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क फी भरण्यातून सूट देण्यात आली आहे.
सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल (Job Opportunity) सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या