करमाळा- गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा बाजार समितीवर इतिहास घडला असून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची २९ वर्षांची सत्ता गेली असून बाजार समितीवर जगताप-पाटील गटाचे संचालक बंडगर यांनी बंडखोरी केल्यामुळे बाजार समितीवर बागल गटाची सत्ता आलेली आहे.
करमाळा बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणूक आज पार पडली पाटील-जगताप गटाचे संचालक शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी करून बागल गटाला पाठिंबा दिल्यामुळे बाजार समितीवर बागल गटाची सत्ता आलेली आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची २९ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आलेली आहे.
करमाळा बाजार समिती निवडणूकीत १८ जागांपैकी ८ जागा जगताप-पाटील गटाला आणि बागल गटाला ८ जागा मिळाल्या होत्या तर शिंदे गटाला २ जागा मिळाल्या होत्या सभापती निवडणूकीत शिंदे गटच किंगमेकर होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात होती शिंदे गट कोणाला पाठिंबा देणार? कोण सभापती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु ऐनवेळी पाटील-जगताप गटाचे संचालक शिवाजीराव बंडगर यांनी बागल गटात प्रवेश केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. यामुळे बागल गटाने सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या ९ जागांचा जादूई आकडा गाठला आणि अपेक्षेपेक्षा बागल गटाने शिवाजीराव बंडगर यांना सभापती पद देऊन टाकले तर बागल गटाचे चिंतामणी जगताप यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली.
सभापती पदी बंडखोर संचालक शिवाजीराव बंडगर तर उपसभापती पदी चिंतामणी जगताप यांची निवड झाली.
किंगमेकर फक्त कागदावरच
बाजार समिती निवडणूकीत दोन जागा जिंकणारा शिंदे गट या निवडणूकांमध्ये किंगमेकर आहे तसेच सत्तेच्या चाव्या त्यांच्याच हातात असल्याची चर्चा झाली होती परंतु अपेक्षेपेक्षा शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी केल्यामुळे शिंदे गट फक्त कागदावरच किंगमेकर राहिला.
२९ वर्षांची सत्ता गेली.
मावळत्या बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांची २९ वर्षांची सत्ता गेली असून त्यांना जोरदार धक्का बसला असून येत्या काळात त्यांना खूप आत्मपरिक्षण करावे लागणार आहे.