कर्जमाफिच नाही तर कमलनाथ शेतकऱ्यांना देणार पेन्शनही

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्जमाफी पाठोपाठ आणखीन एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री होताच दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करणाऱ्या कमलनाथ यांनी ६० वर्षावरील सर्व शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार वयोवृद्ध शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचे सरकार येताच शेतकरी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. राहुल यांच्या आवाहनाला साथ देत मध्यप्रदेशच्या जनतेने कॉंग्रेसला सत्तेच्या खुर्चीवर बसवले. कॉंग्रेसने देखील दिलेला शब्द पाळत तत्काळ कर्जमाफी दिली. त्यामुळे देशभरात कमलनाथ आणि कॉंग्रेसची प्रशंसा केली जात आहे.

आता ज्या शेतकऱ्यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहे अशा दहा लाख शेतकऱ्यांना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. पेन्शन देण्याचा कमलनाथ यांचा निर्णय एैतिहासिक असल्याने राजकीय वर्तुळात याचीच चर्चा सुरु आहे.