काकडी पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते.

काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते. काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठीकाकडीची लागवड जून जूलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करतात.

शेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 30 ते 50 गाडया शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी. उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर स-या पाडून घ्याव्यात. खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करावयाची असल्यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रूंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदूर चरांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर ओळी 30 × 30 × 30 सेमी अंतरावर आकाराचे खडडे तयार करावेतञ प्रत्येक खडडयात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे. प्रत्येक आळयात 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात.

महत्वाच्या बातम्या –