मुळा पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

मुळा हेक्‍टरी प्रामुख्‍याने थंड हवामानातील पीक आहे. मुळयाची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाटयाने होते. परंतु चांगला स्‍वाद आणि कमी तिखटपणा येण्‍यासाठी मुळयाच्‍या वाढीच्‍या काळात 15 ते 30 अंश से. तापमान असावे. मुळयाच्‍या वाढीच्‍या काळात तापमान जास्‍त झाल्‍यास मुळा लवकर जून होतो आणि त्‍याचा तिखटपणाही वाढतो.

मुळयाची जमिनीतील वाढ चांगली होण्‍यासाठी निवडलेली जमीन भुसभूशीत असावी. भारी जमीनीची चांगली मशागत करावी. अन्‍यथा मुळयाचा आकार वेडावाकडा होतो आणि त्‍यावर असंख्‍य तंतूमूळे येतात. अशा मुळयाला बाजारात मागणी नसते. मुळयांची लागवड अनेक प्रकारच्‍या जमिनीत करता येत असली तरी मध्‍यम ते खोल भूसभूशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो.

चोपण जमिनीत मुळयाची लागवड करू नये. पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, जपानीज व्‍हाईट, गणेश सिंथेटीक या मुळाच्‍या आशियाई किंवा उष्‍ण समशितोष्‍ण हवामानात वाढणा-या मुळाच्‍या जाती आहेत.

महत्वाच्या बातम्या –