जाणून घ्या वीज कुठे पडणार? ‘दामिनी’ अँप द्वारे मिळणार माहिती!

दामिनी

मुसळधार पाऊस, वीज पडून अनेक नागरिक तसेच प्राणी मृत्युमुखी पडतात हि दुर्घटना थांबवता येण्यासाठी एक अँप तयार करण्यात आले असून तुम्हाला वीज पडणार असल्यास १५ मिनटे आधी सतर्क करणार आहे ह्या अँप ला सरकारने मान्यता सुद्धा दिली आहे.

दामिनी(Damini) अँप द्वारे वाचले जातील नागरिकांचे प्राण पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता –

माहिती नुसार जून – जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात वीज कोसळते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.
अँप हे GPS Location द्वारे काम करणार आहे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी तुम्हाला सतर्क करणार असून सुळळीत ठिकाणे जावे झाडाचा आश्रय घेऊ नये इत्यादी माहिती हे अँप पुरवणार आहे.

सदरील अँप हे राज्य सरकार तसेच पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी तयार केलेले आहे. त्यामुळे वीजपडून मृत्यूमुखी पडण्याचा आकडा कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.

पाऊस सुरु असल्यास अँप सुरु ठेवावे व लोकेशन चालू ठेवावे.

शेतकऱ्यांसाठी दामिनी(Damini)उपयुक्त अँप
वीज पडण्याचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त असते, पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठी कामे असतात त्यामुळे शेतकरी शेतात सांयकाळी सुद्धा राबत असतात त्यांना ह्या अँप द्वारे नक्कीक फायदा होईल.

पाऊस सुरु असल्यास हे लक्षात असुद्या –
उंच असलेल्या वस्तूवर वीज आधी आढळते म्हणून झाडाचा आश्रय घेणे शक्यतो टाळावे.
वीज जेव्हा आकाशात चमकत असेल तर झाड टेकडीचा उंच भाग उंच इमारती ह्यांचा आश्रय घेऊ नका.
मोकळ्या मैदानात थांबणे उत्तम असते.
शक्यतो पाऊस पडत असेल तर घराबाहेर जाणे टाळावे.

पाऊस थोड्याच दिवसात सुरु होणार असून दामिनी अँप च्या साह्याने जाणून घ्या वीज पडण्याचे संकेत.

महत्वाच्या बातम्या –