कुमारस्वामींची हार ? भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण

कुमारस्वामींची हार

कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. अशा प्रकारे कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अध्यायही संपला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आमचे सरकार 14 महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते पाडण्यासाठी वातावरण बनविण्यात आले.

मी कोणासमोर हात जोडणार नाही मात्र देवाला आजही हात जोडून विचारेन की अशा परिस्थितीमध्ये मला मुख्यमंत्री का बनविले. मी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. भाजपा, चला चर्चा करूया. तुम्ही आताही सरकार बनवू शकता. बहुमताचा आकडा असेल तर घाई कशाला. तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारीही सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. यानंतर भाजपाचे राज्याचे अध्यक्ष बी एस येडीयुराप्पा यांनी त्यांचा पक्ष यावर राष्ट्रीय नेतृत्वासोबत विचार करून पुढील कार्यक्रम आखेल. राज्यपालांनी कुमारस्वामींना दुपारी 1.30 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या –

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

‘धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे’

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.