शेतकऱ्याने लावला शेतातील बांधावर मोठा फ्लेक्स; दोन्ही सरकारची ‘फसवी कर्जमाफी’

शेतकऱ्याचा फ्लेक्स

बुलढाणा – परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर आता आढावा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मंत्र्यांनी दौरे सुरु केले आहेत. मात्र, आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात लावलेल्या एका फ्लेक्सची चर्चा राज्यभरात होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिपते यांनी फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफीसाठी अर्ज केला होता व आताही वर्तमान ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला होता पण दोन्ही सरकारच्या काळात त्याना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठा फ्लेक्स लावला आहे.

या फ्लेक्सवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. या फोटोसोबत ‘फसवी कर्जमाफी’ असा उल्लेख केला आहे.” सोबतच “या दोन्ही सरकारच्या काळात मला कर्जमाफी झालीच नाही… मी एक त्रस्त शेतकरी” या आशयाचा फ्लेक्स त्यांनी आपल्या शेतात लावून कर्जमाफीचा अद्यापही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या-