खतांच्या दरात मोठी वाढ; माहित करून घ्या नवीन दर

मुंबई – डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून अवकाळी पाऊस व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागच्या वर्षी पण शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होत. तर राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता खतांच्या (fertilizers) दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

पुन्हा खतांच्या (fertilizers) दरात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.

खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रब्बी हंगामात काळ्या बाजारातही शेतकऱ्यांना खते सध्या मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे.  पोटॅश, १०.२६.२६ सह इतर खतांच्या दरात अधिक वाढ झाली आहे.

तर १०.२६.२६ या खताचे (fertilizer) दर खरिपात ११७५ रुपये प्रति गोणी (एक गोणी ५० किलो) एवढे होते. तर यात वाढ झाली असून सध्या १५०० रुपयात (एक गोणी ५० किलो) मिळत आहेत. पोटॅशचे (एक गोणी ५० किलो) दर खरिपात १०४० एवढे होते. नंतर तर यात वाढ झाली असून पोटॅशचे दर १३५० रुपये प्रति गोणी इतके झाले आणि सध्या, तर १७०० रुपये प्रति गोणी इतके दर आहेत. यातच गेल्या तीन महिन्यांपासून १०.२६.२६, १२.३२.१६, १४.३५.१४, डीएपी या खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

आशाच प्रकारे इतर रासायनिक खतांच्या किमती देखील वाढल्या आहेत. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली ही लक्षणीय वाढ शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय बनली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –