लातूर : जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ४७ कोटींची वाढ करून २४० कोटींच्या आराखड्यास मान्यता

उपमुख्यमंत्री

लातूर : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-2021 करिता 193 कोटी 26 लाखाचा लातूर जिल्ह्याच्या  प्रारूप आराखड्यात 46 कोटी 74 लाखाची वाढ उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी करून लातूर जिल्ह्यासाठी 240 कोटीच्या प्रारूप आराखड्याला  मान्यता दिली.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, संसदीय कार्य, पर्यावरण सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनगर, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रियंका बोकील यांच्यासह लातूर जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यासाठी मागील पाच वर्षात मंजूर नियतव्यय व खर्चाची माहिती बैठकीत दिली. तसेच मागील वर्षी 232 कोटीचे तुम्ही मंजूर होते तर यावर्षी 2020-21 मध्ये 103 कोटीची अतिरिक्त मागणी त्यांनी केली. यामध्ये अंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती, आरोग्य विभाग, नगर विकास विभातील कामाचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेतून राबविलेल्या विविध योजनेचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले या मध्ये जिल्हा क्रीडा संकुलातील क्रिकेट टर्फ पीच, बाल शिवाजी साहसी उद्यान, लॉन टेनिस कोर्ट बॅडमिंटन हॉल  तसेच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, मेवायकी पद्धतीने वृक्ष लागवड, गणेश विसर्जन ऐवजी मूर्ती दान करण्याचा क्रम तसेच सार्वजनिक विहीर खोलीकरण व दुरुस्ती करून त्याचा परिसरातील लोकांच्या पाण्यासाठी वापर आदी बाबींची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सादर केली. अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी सर्व जिल्हाधिकारी यांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना केली.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यात  नाविन्यपूर्ण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. यातील बाल शिवाजी साहसी उद्यान बारामतीमध्ये  करू असे सांगितले. तसेच  लातूर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 चे 193 कोटी 26 लाखाचे नियतव्यय मर्यादेत 46 कोटी 74 लाखाची वाढ करून एकूण 240 कोटींचा आराखडा श्री पवार यांनी मंजूर केला.

प्रारंभी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यासाठी मागील पाच वर्षात मंजूर नियतव्यय व खर्चाची माहिती बैठकीत दिली. तसेच मागील वर्षी 232 कोटीचे तुम्ही मंजूर होते तर यावर्षी 2020-21 मध्ये 103 कोटीची अतिरिक्त मागणी त्यांनी केली. यामध्ये अंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती, आरोग्य विभाग, नगर विकास विभातील कामाचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेतून राबविलेल्या विविध योजनेचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले या मध्ये जिल्हा क्रीडा संकुलातील क्रिकेट टर्फ पीच, बाल शिवाजी साहसी उद्यान, लॉन टेनिस कोर्ट बॅडमिंटन हॉल  तसेच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, मेवायकी पद्धतीने वृक्ष लागवड, गणेश विसर्जन ऐवजी मूर्ती दान करण्याचा क्रम तसेच सार्वजनिक विहीर खोलीकरण व दुरुस्ती करून त्याचा परिसरातील लोकांच्या पाण्यासाठी वापर आदी बाबींची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सादर केली.

अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी सर्व जिल्हाधिकारी यांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना केली.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यात  नाविन्यपूर्ण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच लातूर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 चे 193 कोटी 26 लाखाचे नियतव्यय मर्यादेत 46 कोटी 74 लाखाची वाढ करून एकूण 240 कोटींचा आराखडा श्री. पवार यांनी मंजूर केला.

महत्वाच्या बातम्या –

कांदा उत्पादकांसाठी धावले सुजय विखे ; लोकसभेत केली ‘ही’ मागणी

शेतीलिलाव आणि सक्तीची कर्जवसुली थांबवण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे नाशिक जिल्हा बँकेसमोर ठिय्या आंदोलन

कोरडा दुष्काळ घोषित करण्यासाठी दररोज निवेदनांचा पाऊस

हवामान अंदाज : महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तापमान घटणार