लातूर बाजार समितीचे आता ई – लिलाव !

लातूर : महराष्ट्रातील नामांकित बाजार समित्यात आघाडीवर असलेल्या लातुरच्या बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत आता ई – लिलाव सुरु केले आहे. सुरुवातीला करडी, सूर्यफूल आणि भुईमूग या तीन शेती उत्पादनांची ई – लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी करडीचे ई – लिलाव करण्यात आले. राज्यातील ३० बाजार समित्यांत ई – लिलाव केले जाणार आहे. त्यात लातूर बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. यासाठी लागणारी यंत्रणा, उपकरणे महाराष्ट्र शासनाने पणन विभागामार्फत उपलब्ध करुन दिली आहेत. बाजार समितीने त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. ई – लिलावाासाठी १६ हजार शेतकरी. १२०० आडते, ४५० व्यापार्यांची नोंद करुन घेतली. हे लोक ई – लिलावामध्ये बोली लावू शकतात, दुकानात बसून व्यापारी आपला भाव सांगू शकतो. यामुळे शेतीमालाला अधिकाधिक भाव मिळू शकतो, प्रारंभी निवडक शेतीमालाचेलिलाव केले जाईल. पायंडा पडला की सगळ्याच शेतीमालाचे ई – लिलाव केले जाईल असे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितले.