किमान आधारभूत हमी किंमतीने तूर खरेदीचा शुभारंभ

खामगाव येथे किमान आधारभूत हमी किंमतीने तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र शासनाच्या सन २०१९-२०२० प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आमदार आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. या योजनेंतर्गत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर या पिकाला ५८०० रूपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

कांदा दरात घसरण सुरूच

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी आणावाए असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी यावेळी केले. यावेळी खरेदी विक्री संस्थचे अध्यक्ष बाबुराव लोखंडकार,तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, संदीप पेठकर, अशोक डोंगरदिवे, सांरगधर भिसे,कृउबास संचालक दिलीप पाटील, भाजपा  महेंद्र रोहणकार, मनोहरसिंग बोदडे, दत्ता पाटील, कृउबास सचिव मुकूटराव भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.