राष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या लक्ष्मीकांत खाबिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य आणि पवार कुटुंबाशी जवळचे संबंध असणाऱ्या खाबिया यांनी अचानक राजीनामा दिल्याने कला, साहित्य, क्रीडा, क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी एड्स आणि स्त्री भ्रूण हत्या यासारख्या सामाजिक आणि संवेदनशील विषयावर सामाजिक प्रबोधनाचे कामही केले. खाबिया यांनी एऩएसयुआयच्या अध्यक्षपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्यांनी पुणे जिल्ह्याचे एऩएसयुआयचे अध्यक्ष, खजिनदार अशी पदे भुषवली.शरद क्रीडा सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला आणि क्रीडा क्षेत्रात काम करीत असलेल्या खाबिया यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार